chitra charoli 362 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३६२

चित्र चारोळी ३६२

आगिनफुलांची रास रचुनीया शिणलेला
कास्तकार मुंडासे लेवूनी निवांत बैसला
निज कष्टाच्या लाल रंगी गिरी सजवला
समाधाने आराम करीत असे बळीराजा
@ मिलिंद कल्याणकर

—————————————————————

चिंता सदैव त्याच्या पाठी
लहरी निसर्ग नेहमीच कोपी
कर्जाचा बोजा असे त्याच्या गाठी
लाल मिरच्या ,भाव मिळेना
@ अनघा कुलकर्णी

————————————————————–

थकून भागून
दमलेला जीव विसावला
कोठे आहे आपण याचा
विचार नाही केला कसला
@सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई

———————————————————–

श्रमलो शीण झाला फार
मिरच्यांवरी घेतसे विसावा
विचार माझ्या मनी आला
तिखट मिरचीचा ठेचा करावा
@सौ सुनीता अशोक भालेराव

———————————————————–

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts