chitra charoli 360 | Aaplaa Vyaaspith news

Thursday, December 12, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३६०

चित्र चारोळी ३६०

चिमुकल्या हातांनी
दोर कसा धरला…!
शेतकरी बाळ सर्वांच्या ,
नजरत भरला….!!
@गजानन पवार

—————————————————–

पायवाट ती ओळखीची
सोनूच्या हाती ढवळ्या पवळ्यांची दोरी
विश्वासू किती ती बैलजोडी
माणसा परिस मेंढर बरी!
@ अनघा कुलकर्णी

——————————————————-

सर्जाराजाची जोडी
घेऊन चालला बाळराजा
शेतकर्‍यांच्या लेकराला
गुराढोरात येते मजा

@ राधिका जाधव – अनपट

————————————————————–

शेतीच्या मित्रांची जोडी साथीला सोनुला
लेवून नील अंगरखा हाती धरला कासरा
हिरवाई विखुरली वाटेच्या उभय बाजुला
सालस सखे चालती, सान पाय साथीला
@मिलिंद कल्याणकर

—————————————————————–

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts