chitra charoli 359 | Aaplaa Vyaaspith news

Thursday, December 12, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३५९

चित्र चारोळी ३५९

आईचे पिल्लू कोंबड्याच्या पिल्लाच
करत आहे पावसापासून रक्षण
किती सुंदर आणि छान दिले आहे
आईने तिच्या पिल्लाला संस्काराचे शिक्षण
@ सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई

————————————————————

निरागस दोन जीव
पावसात चिंब झाले
करून पानाची छत्री
चिमुकल्याने दोघांना अभय दिले
@ राधिका जाधव – अनपट

———————————————————-

भर पावसात जीव फांदीवरी बसले
एक बोलका दोन नाजुक सान मुके
भिजती पीतवर्णी अबोल दोन पिले
भिजता छकुला हरित पर्णछत्री धरे
@मिलिंद कल्याणकर

—————————————————————

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts