chitra-charoli-358 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३५८

चित्र चारोळी ३५८

सूर्य चालला अस्ताला
संध्याछाया नभांगणी
चंद्र उगवला पश्चिमेला
सवे तारका रोहिणी
@ प्राची देशपांडे

———————————————————–

मावळतीचे बिंब क्षितीजी उतरू लागले
जलाशयी प्रतिबिंब वासरमणीचे दिसले
किनारी तरू तृणांसह कृष्णरंगात रंगले
सांजवेळचे रंग आसमंती दाटूनी राहीले
@ मिलिंद कल्याणकर

———————————————————–

सुर्यालाही वाटे
प्रतिरुप आपुले पहावे
अवतरुनी जलाशया वरती
दुरुनच न्याहाळावे!
@ सुनिला मोहनदास

————————————————————

बिंब नि प्रतिबिंब कोणते
मनी संभ्रम मज हा पडे,
बिंबाहूनही प्रतिबिंब साजिरे
माध्यम निश्चल जलाशय असे…
@ ज्योती जाधव

———————————————————

घरी जाताना सुर्य
पाण्यात प्रतिबिंब पाहतो
निहारून रूप साजिरे
डोंगराआडच्या घरी जातो
@ राधिका जाधव – अनपट

————————————————————-

उगवला नेहमीप्रमाणे रविराज
होईल थोड्यावेळाने पहाट
प्रतिबिंब तयाचे पडले जलात
सुंदर दिसे नदीवरचा घाट
@सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई

————————————————————

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts