chitra charoli 350 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३५०

चित्र चारोळी ३५०

बालमनावर संस्कार रूजले
गोमाता मातेसमान
चिमुकल्याची झुकली
गोमाते पुढे आदराने मान

@ राधिका जाधव – अनपट

————————————————————

मनात निरागस
भाव असेल तर
मुक्या प्राण्यातही
देव दिसतो.
@ मिना सैंदाणे कल्याण

——————————————————–

आईने बाळावर केले
सुंदर छान संस्कार
गोमाता देवता आहे म्हणून
दोन्हीं हात जोडून करतो नमस्कार

@ सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई

————————————————————–

सुसंस्कारी बालक
करते वंदन गोमातेला
परिक्षेत यश मिळावे
सांगते जणू ते तिला

@ प्राची प्रकाश देशपांडे

————————————————————

संस्काराचे बाळकडू बाळाला
दिसताक्षणी पाहुनी गायीला
हात जोडून नतसमस्तक झाला
जन्म आईचा सार्थक झाला

©® सुरेखा मालवणकर (सुमा)

————————————————–


About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts