chitra charoli 348 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३४८

चित्र चारोळी ३४८

प्राजक्ताच्या सुगंधाने
पाऊसही धुंदावून गेला
धुंद मधुर वासाने
समा स्वर्गमय झाला
@ राधिका जाधव – अनपट

——————————————————

पंच पंच उषःकाल समयी
उमलूनआली कळी कळी
प्राजक्ताची सुगंधीत फुले
देठ केशरी धवल पाकळी
@ प्राची प्रकाश देशपांडे

——————————————————

प्राजक्ताचे फुल विसावले काचेवरी
धवल पाकळ्या स्वरूप न्याहळती
विमल दल बंधनात गर्क देठ शेंदरी
प्रतिबिंबत नाजुक फुल आरस्पानी
@ मिलिंद कल्याणकर

—————————————————-

भार सहावेना जणू प्रीतीचा
प्राजक्त ओघळला पाण्यात
सुगंध शिंपीत चांदण पहाटे
निवांत वाहतो पाण्यात
©®सुरेखा मालवणकर (सुमा)

——————————————————

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts