chitra charoli 334 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३३४

चित्र चारोळी ३३४

सोबत करतो जाता
त्याच्याशी नातं बांधल्यावर
मिळते पोटभर भाकर
मायने दळण रांधल्यावर

@अक्षया किरण मोरे
कळवा ठाणे

——————————————————

जात्यावरच्या ओवीने
झाली प्रसन्न पहाट
आई-आजी गाते ओवी
ऐकण्यास लागे अविट

@ राधिका जाधव – अनपट

———————————————————–

गोडी जात्या ओविची
माय दळण दळते
माये ओंजळीतील दाणे,,
जनू अमृतं रांधते …
@ गजानन पवार

——————————————————-

मुलां-नातवंडांचे कौतुक गुंफत
ओवी गाई माऊली पहाटसमयी,
जात्याला धान्याचा घास भरवत
कष्टकरी घरधन्यालाही दैवत्व देई…
@ ज्योती जाधव

————————————————————

नवी नवरी आली घरात
दळण दळीते माजघरात
किणकिण बांगड्याची कानी
हिरवा चुडा तिच्या हातात

@ प्राची प्रकाश देशपांडे

—————————————————————-

जात्यावर दळण ‌दळतांना
सुंदर गीत गावे
ज्याच्यामुळे घरदार
त्या आवाजाने जागे व्हावे

@ सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई

———————————————————–

दळताना धान्य दोन्ही हातांनी
पहाट रंगती सुरेल स्वरांनी
येई ओठांवरती ओवी अभंगवाणी
मंत्रमुग्ध करती जात्यावरची गाणी

@ प्रतिक्षा कांबळे (psb)

—————————————————————

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts