chitra charoli 321 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३२१

चित्र चारोळी ३२१

स्पर्श करता चरणी गुरुच्या
धन्य होते सारी काया
गुरु देतात वाळवंटात ही
आभाळ बनूनी छाया .

@ अक्षया किरण मोरे
कळवा ठाणे

———————————————————–

न मिळे जगति
गुरुविण ज्ञान
तयांपुढे राहो सदा
आमुची झुकती मान

@ हर्षदा जोशी पुराणिक

————————————————————-

आम्ही ज्ञानाचे याचक गुरू असे अमुचा दाता 

देण्या संस्कारांचे दान लाभला आम्हास त्राता 

त्यांचाच मिळे आधार जीवनातील हर घडीला

यशाची वाढती कमान प्रभाव असे शिक्षणाचा  

@ मिलिंद कल्याणकर

——————————————————————-

सदगुरूच्या पायावर
ओंजळ वाहू पुष्प फुलांची…!
वरद हस्ते आशिष देती,
पुण्याई लाभे जन्मो जन्माची…!!

@ गजानन पवार हिंगोली

——————————————————————-

गुरुपौर्णिमेचा शुभ दिन
करु वंदन गुरुंना
मार्गदर्शक जीवनात गुरु
देऊनीया गुरुदक्षिणा

@ प्राची देशपांडे

———————————————————————-

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!