chitra charoli 320 | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३२०

चित्र चारोळी ३२०

साखर झोपेत
जग सर्व विसावले
प्रकाशाला घेण्या कवेत
ढग सारे आसुसले

@ राधिका जाधव – अनपट

———————————————————–

गगन झाकोळले कृष्ण मेघांनी
प्रभात किरणे उतरली त्यातुनी
मेघाछायेत सदने गेली झाकुनी
उजळूनी दिप पळती काळोखी

@ मिलिंद कल्याणकर

——————————————————-

शाल मेघांची पांघरून

रवी आला गं पहाटे

बघ दव आणि सरीचे आज

जुळले गं नाते

@ चंद्रहास रहाटे

————————————————————–

झाकोळले आभाळ निळे
ढग दाटले काळे काळे
लागली पावसाची चाहुल
सूर्यदेव ढगाआड गेले

@ प्राची प्रकाश देशपांडे

————————————————————-

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts