चित्र चारोळी ३१८

चित्र चारोळी ३१८

लाल केशरी रंग आगळे
उधळतो नित्य रवी भूवरी
मज देई साक्ष हा तरुवर
लाजते ही धरा बावरी

@ हर्षदा जोशी

—————————————————–

परमेश्वरा कोण हा चित्रकार
विलोभनीय रूप तूझे त्याने कुंचल्यातून केले साकार.
निसर्गाचा अमोल ठेवा भूमाते

चरणी केला बहाल…
@ ऊज्वला रवींद्र राहणे विक्रोळी

————————————————————————-

उगवतीच्या रंगी उजळली प्राची
किरणांने न्हाहली गिरींची माथी
पाण्यावर झुलती मंद मंद लहरी
कल्पवृक्ष झावळी विराजे गगनी

@ मिलिंद कल्याणकर

—————————————————————————

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!