Breaking News

चित्र चारोळी ३१४

चित्र चारोळी ३१४

सुबक कौलारू घर, सभोवती बन पाचुचे
गिरीमाथी विराजले शुभ्र ढग आसमंतीचे
पर्वतावर साज चढले हिरव्या तरूवेलींचे
परिसर हिरवाईने नटला हे देणं निसर्गाचे

@ मिलिंद कल्याणकर

————————————————————–

हिरवेगार गालिचे
जमिनीवर अंथरले
माझे घरकुल मधोमध
मन मोहुनीया गेले

@ प्राची देशपांडे

—————————————————–

हिरव्यागार शेतामध्ये कौलारू घर
पाठराखा जणू भासे डोंगर
आकाशाच्या छायेखाली वसलेला परिसर
चित्रकाराने रेखाटण्याजोगे निसर्ग सुदंर

@ प्रतिक्षा कांबळे (psb)

——————————————————–

हिरव्या कुराणात
इवलंसं घर संसार
कष्टाचा आनंद लाभे
जीवनात अपरंपार

© सुमा ( सुरेखा मालवणकर )

———————————————————–

हरीत गालिचा तृणाचा,
कौलारू घर तयावरी ।।
भोवताली गर्द वनराई,
मेघ उतरे गिरीशिखरी ।।

✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद

————————————————————–

निसर्गरम्य ठिकाणी
घर कौलारू आहे छान
हिरव्या रम्य परिसरात
हरपून गेले देहभान

@ सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई

————————————————————-

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!