चित्र चारोळी ३१३

चित्र चारोळी ३१३

निसर्गाच्या सान्निध्यात
मोर आनंदाने बागडते…
रंगबिरंगी रंगाची उधळण,
मन मोहून जाते…
@ गजानन पवार

——————————————————

चिंचोली ग्राम अनोखे
स्वैरपणे मोरांचा संचार
हिरवाई सभोवती छान
पिसारा फुलवूनी नाचे मोर

@ प्राची देशपांडे

———————————————————

शुभ्र उन्हाचे कवडसे धरेवर उतरले
वाटेच्या उभय तटी तरूतृण बहरले
डौलदार मयुर दाणे टिपण्या जमले
देखण्या मोरांचे थवे वेचण्या दंगले

@ मिलिंद कल्याणकर

———————————————————-

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!