चित्र चारोळी ३११

चित्र चारोळी ३११

हिरवी किनार करड्या रस्त्याला
शेवाळी मिनार नितळ पाण्याला
माडांची भेट उंच आकाशाला
निसर्गाचे प्रतिबिंब भुलवी मनाला

©प्रतिक्षा कांबळे (psb)

———————————————————————-

हरित तृणात कल्पवृक्ष डौलात डोलती
सुबक वाट उजळून आली सूर्यप्रकाशी
शांत जळी तरूकर स्वमुख न्याहाळती
दान निसर्गाचे उधळण हिरव्या पाचुंची

@ मिलिंद कल्याणकर

———————————————————————–

नवतीचा शालू नेसली धरती
शोभे पाण्याचा निळा पदर,
नक्षीदार सुंदर माड डोलती
करडा काठ नि हिरवी झालर…
@ ज्योती जाधव.

———————————————————————–

आकाशी आभाळाखाली
निसर्गाची पसरलेली माया
हिरवी झाडे उभी राहूनी
देती नदी काठाला छाया

@ अक्षया किरण मोरे
कळवा ठाणे

————————————————————

हिरव्या हिरव्या झाडातून
करड्या रंगाचा जातो मार्ग
सुंदर मनमोहक दृश्य
जसा पृथ्वीवर सजला स्वर्ग

@ सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई

————————————————————-

बरसून आला पाऊस
हिरवाईने परिसर सजला
रस्त्यावर दुतर्फा झाडी
आनंद देतसे मनाला

@ प्राची देशपांडे

—————————————————-

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!