चित्र चारोळी ३०४

चित्र चारोळी ३०४

सरणारी कातरवेळ संथ सागरी किनारा
तांबूस सूर्य उंच माडातून डोकावणारा
मनास रिझवी सावल्यांचा खेळ सारा
दोघांच्या भेटीस रंगला निसर्ग सारा

@ प्रतिक्षा कांबळे (psb)

—————————————————

सांजवेळ झाली
सूर्य अस्ताला चालला
साःजसावल्या का उगा
भिवविती हृदयाला

@ प्राची देशपांडे

—————————————————–

तोच निसर्ग तेच आकाश
फुलतो परी रोज नवा श्वास
जगण्याशी आधार हे विश्व्
लावते एक नवा हव्यास

© सुमा (सुरेखा मालवणकर )

——————————————————

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!