चित्र चारोळी ३०३

चित्र चारोळी ३०३

जीवनातले रंगतरंग
जणू निर्मितो अनंत
ठेविले तैसेच रहावे
तोची एक संत !

@ सुनिला मोहनदास

———————————————————–

ही वाट स्वर्गाची का ?
कर्माची आनंदफुले
टुकार मन माझे घेई
स्वच्छंद स्वैरझूले

@ हर्षदा जोशी

———————————————————

स्वप्नामधून जाते
वसंताची हि वाट
साजण माझा तिथे
असेल माझ्या सोबत

© सुमा (सुरेखा मालवणकर)

———————————————————

तृण कोंदणात पायवाट दुहेरी
हिरवे वैभव उजळले परिसरी
मधुमास बहरला विविध रंगी
निसर्ग लावण्य मनासी मोही

@ मिलिंद कल्याणकर

——————————————————

हिरवी हिरवी वनराई
रंगाची करते उधळण
सर्वांना सांगत आनंदाने
वसंत ऋतूचे झाले आगमन

@ सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई

—————————————————–

वसंत ऋतुचे आगमन
वसुंधरा सजली नटली
हिरवाईत सुंदर सुंदर
विविधरंगी फुले फुलली

@ प्राची देशपांडे

—————————————————–

रांगोस्तव सृष्टीचा
असा बहरास येई
मनासवे नजरेचे
पारणे फिटून जाई…..

@ मनीषा वाघे

————————————————————–

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!