चित्र चारोळी ३०१

चित्र चारोळी ३०१

निरभ्र मोकळे आकाश
निळा सागर
जांभळ्या निसर्गास
प्रीतीची झालर

© सुमा (सुरेखा मालवणकर)

——————————————————–

निवांत सागरात
चल विहार करू
करु थोडे हितगुज
थोडे भूतकाळास स्मरू

@ राधिका जाधव – अनपट

——————————————————

ओहोटीच्या सागरी विहरे
एक नौका रम्य सांजवेळी,
तटावर उभे पिंपळ रोपटे
लहरे वा-यासंग एक डहाळी…

@ ज्योती जाधव

——————————————————

शांत निळ्या सागरी
नौका एक विहार करी..
निसर्गाचे रूप देखणे
चल पाहू सकाळ प्रहरी..

@ घनश्याम बोह्राडे

——————————————————

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!