Breaking News

चित्र चारोळी २९९

चित्र चारोळी २९९

पुनवेच्या रम्य चांदण्या राती
एक चंद्र त्या नभी दिसतसे,
अन् दुसरा या सागर किनारी
कवेत माझ्या धुंद विलसे…
@ ज्योती जाधव

———————————————

चंद्राला साक्षी ठेवून
तुझ्या मिठीत विसावले
सोडू नकोस अर्ध्या वाटेवर
माझे विश्व तुझ्यात वसवले

@ राधिका जाधव – अनपट

—————————————————-

तुझ्या माझ्या प्रेमाच्या
रंगाला आला आहे बहर
पौर्णिमेचा चंद्र ढगात
बघण्यासाठी झाला आहे हजर

@ सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई

———————————————————

पुनवेचा चंद्रमा गगनी
चांदण्यांसवे आली रोहिणी
वचन देते तुजला
सखया मी तुझीच साजणी

@ प्राची देशपांडे

——————————————-

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!