what-is-the-right-time-to-eat-part-4 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग ४

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग ४

दिवसा सूर्य असतो. रात्री सूर्य नसतो.

सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पचनाला मदत करणारा. म्हणून तर आयुर्वेदात एक वचन आहे, आरोग्यम् भास्कराद् इच्छेत. म्हणजे आरोग्य ठीकठाक ठेवण्यासाठी सूर्याची भूमिका महत्वाची आहे.
सर्वात शुद्ध काय असते ? अग्नि सर्वात शुद्ध. सूर्य म्हणजे अग्नि. सूर्य म्हणजे शुद्धता. सूर्य उगवला की बाकी सर्व जीवजंतु नष्ट व्हायला सुरवात होते. या सूर्याची उष्णता त्यांना सहन होत नाही, आणि त्यातील काही जीवजंतुंचा जन्म संपतो.
आपण सूर्याला केंद्रस्थानी मानतो. आपली भूमाता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. केवळ भूमाता नाही तर तिचे सर्व मंगळ, बुध, गुरू, शनि, शुक्र हे सर्व भाऊबंद, आपल्या मुलाबाळांसह याच सूर्याला केंद्र मानतात. आणि त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत आपली कामे करीत असतात.
आपण आपली दिनचर्या पाळतो. सकाळी उठतो, रात्री झोपतो. पशुपक्षीदेखील, सकाळी उठतात, रात्री झोपतात. म्हणजेच सर्व निसर्ग या सूर्याच्या अधिकारात काम करत असतो.
आजच्या वैज्ञानिक नियमानुसार “फोटो सिंथेसिस” ही प्रक्रिया देखील सूर्यावरच अवलंबून असते. पानातील हिरवा रंग देखील याच सूर्यामुळे मिळतो. रक्तातील लाल पेशी वाढायला, कॅल्शियम वाढायला, आणि मुख्य म्हणजे व्हिटामिन डी वाढायला फक्त सूर्य मदत करतो. कोणत्याही प्रकारे व्हिटामिन डी कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. जरी जाहिरातीतून तसे दावे केले जात असले तरी, जाहिरातीमधे दाखवतात, ते सर्व खरे कुठे असते ? असो.
तर आपण सूर्यवंशी आहोत. सूर्य उगवतो, त्याच्या स्वागताला आपण आधी उठतो, तो मावळला की आपले सर्व व्यवहार बंद करीत झोपी जातो. हा निसर्ग नियम आहे.
या सूर्याला साक्षी ठेवूनच आपण आपली सर्व महत्त्वाची कामे करीत असतो. जसे नेहमीचे पोटभरतीसाठीचे व्यवसाय, लग्न, मुंज, वास्तुशांत, गृहप्रवेश, होमहवन, वाढदिवस, देवदर्शन, बारसे, इ शुभकार्ये दिवसाचीच केली जातात. कधी विचार केलाय, असं का, असा ?

तेव्हा उत्तर मिळालं, सूर्य असतो म्हणून.
तसेच जेवणे हे जर यज्ञकर्म असेल तर ( तर म्हणजे ते यज्ञकर्मच आहे. वदनी कवल घेता…… जाणिजे यज्ञकर्म । ) ते सुद्धा सूर्य असे पर्यंत पार पडले पाहिजे ना !

म्हणूनच सूर्य असे पर्यंत जेवावे, कारण आपणही याच निसर्गाचा एक हिस्सा आहोत ना !!

तेच नियम आपणही पाळले पाहिजेत, जे “त्याने” ठरवून दिलेले आहेत.

निसर्गापुढे आपली बुद्धी म्हणजे किस झाड की पत्ती !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts