simple-living-principles-part-sixty-three | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग त्रेसष्ट

जगण्याची साधी सोप्पी तत्वे         भाग त्रेसष्ट

जे जे देवासाठी ते ते देहासाठी

        भाग 19

         पुष्प सातवे

पत्री पूजे मधे आणखी कोणाकोणाला मान दिला आहे तो पाहू.

माका, बेल, धोतरा, तुळस, शमी, आघाडा, डोरली वांगी, कण्हेर, रूई, अर्जुन, गोकर्ण, वड, ताड, केवडा, निर्गुंडी, इडलिंबू किंवा महाळुंग, आवळा, अशोक, दुर्वा, कदंब, ब्राह्मी, जास्वंद, गुलाब, जाई, जुई, चमेली, सायली, चाफा, इ. अनेक वनस्पतींची पाने देव आणि विशेषतः देवींसाठी सांगितलेली आहेत.

यातील काही नावे कळणार नाहीत, गुगल गुरूजींना विचारलेत तर फोटोसहीत दाखवतील.
ही सर्व पाने आपल्या अवतीभवती असतात. फक्त अज्ञानामुळे आपणाला त्याचे उपयोग माहिती असत नाहीत. पण प्रसंगी जीव वाचण्यासाठी सुद्धा काही पाने उपयोगी ठरतात.
पानफुटी किंवा घावमारी किंवा कोंबाचे पान नावाची वनस्पतीचे पान रक्तस्तंभक आहे. म्हणजे कोणत्याही अवयवातून होणारा रक्तस्राव, किंवा बाह्य आघातामुळे जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी ही पाने जादूसारखी काम करतात. जखमेच्या आकारानुसार याची दोन तीन पाने वाटून ही पानांची चटणी जखमेवर लावली असता, जखम पटकन भरून येते.

पेरूचा पाला, लाजरीचा पाला अशाच प्रकारे काम करतो. विशेषतः मुळव्याधीचे रक्त थांबवण्यासाठी पोटातून सुद्धा या पानांची चटणी खावी.
जाईचा पाने चावत राहिली तर तोंडात येणारे उष्णतेचे फोड कमी होतात.
तुळशीचे पान तर कफ विकारावर हुकुमी एक्काच आहे.
हे सर्व उपचार करताना कोणातरी वडीलधारी माणसांची मदत घ्यावीच. यासाठी ते आपल्या जवळ असावेत,( वृद्धाश्रमात नसावेत. ) अन्यथा याचे प्रमाण, वापरायची पद्धत हे सर्वच काही लिहिता सांगता येत नाही ना. यासाठी गुरू हवा. जवळपास असणाऱ्या वैद्यांना भेटून त्यांच्या सवडीनुसार निसर्गाने दिलेल्या या अमूल्य ठेव्याचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे. अशी अनेक मंडळी आपल्या अवतीभवती असतात, यांच्याकडून जेवढे मिळेल ते ज्ञान घेत जावे, शिकत रहावे, ज्ञानी होत रहावे.
एरंडाचे किंवा कापसाचे पान टाळूवर ठेवले असता, डोके गरम होत नाही. लहान मुलांची टाळू तेलाने भरून झाल्यावर त्यावर कापसाचे पान लावण्याची आपली परंपरा आहे. आता ‘अंगाला तेल लावूच नका’, असं डाॅक्टरच सांगतात, तेव्हा विषयच संपला. पण या सर्व जुन्या परंपरा कालबाह्य नक्कीच नाहीत. डाॅक्टरांना देखील माहिती आहे, की या रूढीमागील आरोग्य जरी आपल्याला माहिती नसले तरी, आपण लहानाचे मोठे झालो तेव्हा आपल्या आईने आपल्याला हे सर्व उपचार केलेले होते, फक्त हे उपचार आज आमच्या पाश्चात्य धर्तीच्या सिलॅबसमधे लिखित स्वरूपात नाही, आणि आमच्याकडे यातील आरोग्य शोधून काढायची दृष्टी नाही एवढंच.
देवाच्या नावाने का होईना पण काही वनस्पतींना आपल्या अवतीभवती जागे ठेवणाऱ्या या भारतीय रूढी परंपरंपरांना साष्टांग नमस्कार.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts