simple-living-principles-part-one-hundred-ten | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग एकशे दहा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे                  भाग एकशे दहा

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग चार

नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

इथे वापरलेला सम शब्द हा सर्वधर्मसमभाव यामधल्या सम पेक्षा थोडा वेगळा आहे. समभाव हवाच, पण नको त्या ठिकाणी नको. इतर जण जर सम भावाने पाहात असतील, कृती करत असतील तर समभाव आपणही जरूर दाखवावा. नको त्या ठिकाणी समभाव दाखवत गेलो तर अबू चे रूपांतर बाबूत होते आणि नंतर हे डोक्यावर चढून बसतात.

प्रत्येकाची भूक वेगळी प्रत्येकाची गरज वेगळी इथे समदृष्टी उपयोगी नाही. सगळ्यांनी दररोज एक राईसप्लेट एवढेच जेवण जेवावे, असा समदृष्टी नियम केला तर चालेल ? ( डाॅक्टरांच्या फाईलमधे मधुमेहींचे जेवण, ह्रदयरोग्याचे जेवण छापलेले असते. हे केवळ दिशादर्शक म्हणून छापलेले असते. ते अगदी वजनी प्रमाणात छापलेले असले तरी वजनकाटा घेऊन कुठे जेवतो आपण. शेवटी तारतम्य महत्त्वाचे ! समता विषमता आणि तारतम्यता कुठे कशी वापरायची हे ज्याचे त्याने ठरवावे. कायदा करून केलेली समता, समतेच्या नावामागील जातीयता, आणि धोक्यात येते ती राष्ट्रीयता ! असं कशाला करता ?

शरीरात देखील मेंदू, ह्रदय, यकृत, किडनी यांना जरा जास्त रक्त पुरवले जाते. नंतर पाय हात यांचा नंबर, नंतर मांस नंतर हाडे नंतर स्नायु आणि नखांना केसांना तर रक्त अजिबात नाहीच. शरीर इथे समदृष्टीने वागत नाही. जिथे आवश्यक आहे तिथे जास्त. जिथे गरज नाही तिथे नाही. उगाचच नखांना समभाव दृष्टीने रक्त जास्त दिले असते तर ? आम्हाला नको तिथे सर्व समभाव आठवतो. आणि आपटतो आणि आटोपतो.

रोग होऊ नये यासाठी सांगितलेल्या पथ्यामधे ‘सम’ शब्द जेव्हा येतो तेव्हा त्याचा अर्थ आणखी व्यापक होतो.

सम म्हणजे समदृष्टीने सर्वांकडे पाहणारा असावा. ही समदृष्टी दोघांनाही हवी. आरोग्याचा विचार केला तर रुग्णाला आणि वैद्यांना.

जे औषध मी माझ्या घरातील कोणाही नातेवाईक मंडळीना बिनधास्त देऊ शकत असेन तर ते औषध माझ्या समोरील रुग्णांना सुद्धा त्याच विश्वासाने देता आले पाहिजे. इथे दुजाभाव नको. हा समभाव हवाच. हा विचारसरणीतला फरक आहे. तुमच्या समोर बसलेला प्रत्येक जण हा तुमचा बंधु, पिता, चुलता असेल किंवा माता, भगिनी असेल, असा विचार करूनच त्यांच्यासाठी औषध निवडावे. इथे भेदभाव नको. असे आयुर्वेद सांगतो. ही समता. हीच बंधुता. समोर आलेला जर ओळखीचा असेल तर त्याला वेगळे औषध, अनोळखी असेल तर त्याच्यासाठी वेगळे, असे नको.

जसं वैद्याकडे ही समदृष्टी आवश्यक आहे तशीच समतेची वागणूक रुग्णाकडूनही, डाॅक्टरना अपेक्षित असते. दुसऱ्या डाॅक्टरना एक प्रश्न सोडाच, पण एखाद्या न समजलेल्या शब्दाचा अर्थ सुद्धा विचारणार नाहीत, सगळं अगदी सुमडीत. पण वैद्यांकडे मात्र हज्जार वेळा एकच प्रश्न विचारत बसतील. इथे सर्व समता वगैरे गुंडाळून ठेवतील. असे नको व्हायला. समतेचा आदर दोन्हीकडून हवा.

व्यक्ती स्वतंत्रता, सामाजिक समता आणि जातीनिहाय बंधुता, याबरोबरच महत्त्वाची राष्ट्रीयता आणि राष्ट्राची अखंडता.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts