simple-living-principles-part-one-hundred-nine | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग एकशे नऊ

जगण्याची साधी सोप्पी तत्वे                  भाग एकशे नऊ

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग तीन

नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

दाता असावं.
घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे आपण पण दानी व्हावं. केवळ पैशानं नाही तर गुणाने आणि ज्ञानानेसुद्धा.
आपले सगळे अवयव बघा कसे “दाते” आहेत. कोणत्याही अपेक्षांशिवाय आपल्याला आतून आपलेपणाने सतत देत राहातात. रसरक्त, अश्रु, स्तन्य, लाळ इ.इ. काही वेळा तर सर्व अंतस्रावी ग्रंथी आपली परवानगी न घेता सुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे ते, न मागता तयार करून देतात. असा दाता व्हावं.
दान हे सत्पात्री असावं. ज्याला दान दिलं जातंय तो तसा लायक आहे की नाही ते पाहून द्यावं, नाहीतर दान देऊ नये.
सरकारचा कर चुकवून चार्टर्ड माणसाला आपण जास्त रक्कम देतो. सरकारला देण्यापेक्षा मंदीरातील देवाकडे दान जास्ती दिले जाते, याचेही कारण दान घेणारा सत्पात्री असावा, हेच असेल काय ?
एका हाताचं दान दुसऱ्या हाताला कळू नये, एवढं ते गुप्त असावं. नाहीतर दान दिल्याचाही अहंकार निर्माण होतो. आपल्या आर्थिक कोषाची गरज म्हणून दान करणारेदेखील अनेक जण आहेत. पण याने दानाचे पुण्य मिळत असेल तर ते मिळणार नाही, एवढं मात्र नक्कीच!
नेमकी दानामागची संकल्पना काय आहे ? स्वत:ला नको ते द्यायचं, म्हणजे दान का ?
की आपल्याकडे जास्ती झालंय, म्हणून दुसऱ्याला द्यावं ? की आपल्याजवळ जे आहे त्यातील थोडेसे दान करावे, की शरिराला आरोग्यदृष्ट्या जे अयोग्य आहे ते दान म्हणून सोडावे.?
शंकराला श्रावण महिन्यात दर सोमवारी वाहिलेली धान्याची शिवामूठ आपल्या हातून दानाचा संस्कार घडावा, यासाठीच आहे.
दान ही संकल्पना फार मोठी आहे.
आपल्याला आवश्यक असताना, जे दुसऱ्याला दिले जाते, ते दान सर्वश्रेष्ठ होय.
आपली भूक भागल्यानंतर उरलेली भाकरी इतरांना देणं, हे झालं एक दान.
आपल्याला भूक नाही म्हणून आपली दुसऱ्याला देणं, हे दुसऱ्या प्रकारचं दान
स्वतःला भूक असताना आपली भाकरी दुसऱ्याला देणं हे सर्वात उत्तम प्रकारचं दान.
जीव वाचवणारी स्वतःची कवचकुंडले दान म्हणून देणारा कर्ण यासाठीच यावतचंद्रसूर्य दानशूर ठरला.
ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान तर प्रसिद्धच आहे.
विरू आणि बसंतीचा जीव वाचावा म्हणून छापकाट्याचा निश्चित निर्णय माहिती असून, मित्रासाठी जीव अर्पण करणारा शोलेतील जय हा आजच्या काळातील जीवदानाचा आदर्श.
असे कितीतरी आदर्श आपल्या अवतीभवती असतात. वंदेमातरम म्हणत देशासाठी जीव कुर्बान करणारे लाखो सैनिक आणि क्रांतीकारक होऊन गेले. त्याच देशात “आम्ही वंदेमातरम म्हणणार नाही, तरीसुद्धा भारताने आम्हाला अल्पसंख्य म्हणून पोसावे” असे जाहीरपणे सांगणाऱ्या खानांच्या खानदानाला जीवदानाचे महत्त्व कसे कळणार ?
आम्ही मेल्यानंतर सुद्धा अवयवदान करायला घाबरतो, तर जिवंतपणी काय रक्तदान करणार ?
आणि हो, जे दान करायचे ते आपल्या जिवंतपणीच. कारण आपण मेल्यावर देह तरी आपला कुठे राहातो, तो जसा त्याच्याकडून आला, तसा त्याला परत करायचा.
जिवंतपणीच आपल्या हाडांचे दान इंद्राला वज्र बनवण्यासाठी देणारे दधिची ऋषी हे आमच्यासाठी दानातील सर्वोत्तम आदर्श आहेत. दाता असावा तर असा !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts