post-ayurvedic-approach-part-six | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन भाग सहा

आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन            भाग सहा

ज्या लॅबोरेटरीच्या रिपोर्टस् वर आपण अवलंबून रहातो, त्या लॅब रिपोर्ट च्या मागील छापील बाजू कधी वाचून बघीतली आहे ? किंवा काही वेळा रिपोर्ट च्या खालीच अगदी बारीक अक्षरात लिहिलेलं असतं.( सिगरेटच्या पाकिटावर कसं दिसेल न दिसेल अशा अक्षरात लिहिलेलं असतं…. “सिगरेट स्मोकिंग इज इन्युरस टु हेल्थ”)
मुद्दाम वाचा.

मला त्यांचं कायम कौतुक वाटतं. सगळी कार्डस अगदी ओपन असतात. लपाछपीचा व्यवहार नाही. जे सत्य आहे ते अगदी लेखी लिहूनच देतात. नंतर मागाहून कोणी गडबड नको करायला, आम्हाला सांगितलेच नाही, माहितीच नव्हतं वगैरे…..
आपले जे रक्त लघवी वगैरेचे रिपोर्टस दिले जातात, त्या रिपोर्टवर जे काही लिहिलेलं असते, ते फक्त ती चिठी लिहून देणाऱ्या डाॅक्टरसाठीच असते. त्याचा रूग्णाशी खरंतर काहीच संबंध असत नाही. रूग्ण हा त्या कागदाचा केवळ वाहक असतो. तो रिपोर्ट काय आहे, कसा आहे, बरोबर आहे की नाही, हे त्या पॅथाॅलाॅजीच्या असिस्टंटनी कधीही रूग्णाला सांगायचे नसते. सल्लेही द्यायचे नसतात. त्यामुळे त्या कागदावर खाली काही वाक्ये असतात…

जसे,

The analysis results are only answer to corrosponding sample.

The reported results is for information and for interpretation of referring doctor only.
याचा अर्थ असा होतो की, हा केवळ वैद्यकीय व्यावसायिकासाठी समजेल अशा वैद्यकिय भाषेत लिहिलेला कागद आहे. त्यात रूग्णांनी आपले डोके खर्च करू नये. त्याचा अभ्यास ज्यांना आहे, अशा वैद्यकिय जाणकारांनी त्या रिपोर्ट चे अर्थ नीट समजतील अशा भाषेत लावावेत, आणि आपल्या रुग्णांना सांगावेत. त्यासाठी योग्य तो मोबदला रूग्णांनी, त्यांना दिलेला असतो. (काही वाक्यांचे विस्तृत अर्थ खरंतर कंसातील आहेत, पण कंस न टाकता लिहिले आहेत.)
Referring doctor…….who understand the meaning of reporting units, reference ranges, and limitations of technologies should interpret the results.
“त्यांनीच याचे अर्थ लावावेत, ज्यांना या रिपोर्टमधील युनीट, रेफरन्स रेंज यांची पूर्ण माहिती, पूर्ण अभ्यास, ज्ञान आहे. तसेच रिपोर्ट करण्यासाठी जी मशीनरी वापरली गेली, त्या विशिष्ट कंपनीच्या मशीनरीचे, त्या मशीन मधील रिपोर्टींग करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीमधील त्रुटींचे, अंतिम निष्कर्षावर जे परिणाम होतात, ते समजून घेऊन तसे रुग्णाला सांगितले जावे.”
हे सर्व ज्यांना माहिती नाही, त्यांनी जर, गलत तरीकेसे, अपने अंदाज से, इस रिपोर्ट को पढा और अपने तरीके से यदी समझ लेने की कोशीष की, और अगर गलतीसे कुछ उल्टा पुल्टा हो गया, तो इसके जिम्मेदार हम नही रहेंगे ।
बरोबरच आहे ना. मोबाईल जरी आपल्या मालकीचा असला तरी, त्याचा बिघाड बघण्यासाठी, अतिहुशारी करून, नेट वरून वाचून, मोबाईल खोलून, दुरूस्ती करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का ?
आणि इथे तर प्रत्यक्ष स्वतःच्या जीवाशी खेळ असतो. म्हणून पॅथाॅलाॅजीचे तज्ञ डाॅक्टरदेखील या रिपोर्टचा योग्य तो अर्थ लावू शकत नाहीत, कारण त्यांनी रुग्णाला काही वेळा बघितलेला पण नसतो.
अशा अर्धवट ज्ञानावर आरोग्याचे निष्कर्ष काढणे तर फार धोक्याचे असते.

ना रे बाबा ना !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts