post-ayurvedic-approach-part-seven | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन भाग सात

आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन            भाग सात

लॅबच्या रिपोर्टच्या मागील बाजूला एक वाक्य अजून छापलेले असते.

Individual laboratory investigations are never conclusive, but should be used along with other relevant clinical examinations to achieve final dignosis.

त्याचा भावार्थ असा की, आम्ही दिलेले हे तपासणीचे रिपोर्ट हे कदापि अंतिम निदान असत नाही. रुग्ण जी लक्षणे सांगत असतो, त्यातील लक्षणाबरोबर हा रिपोर्ट अभ्यासून पहावा. आणि त्यानंतरच अंतिम निदान करावे.

याचा दुसरा सरळ अर्थ असा होतो, जिवंत रुग्ण जी लक्षणे सांगतोय ती, निर्जीव यंत्र सांगत असलेल्या रिपोर्टपेक्षा, जास्त महत्वाची असतात. कोणत्याही यंत्रावर पूर्णपणे विसंबून राहू नका. अहो साधा वजन काटाच घ्या ना, चार वजन काट्यावरचे आपलेच वजन वेगवेगळे येते. रेल्वे स्टेशनवरच्या चकाकत्या मशीनमधले वजन वेगळे, बस स्टॅन्ड वरचे वेगळे, रेल्वेच्या ब्रीजवरील एक रूपयातले वजन वेगळे, दवाखान्यातले वेगळे, जीम मधल्या काट्यावरचे वेगळे. असे का होते ? प्रत्येक मशीनमधले हे तांत्रिक दोष असतात. कुणाची स्प्रिंग जुनी असते तर कुणाचा सेल संपत आलेला असतो, कुणाचा बॅलन्स गेलेला असतो, तर कुणाचा पाया पक्का नसतो.

पण वजन करणाऱ्याचं काय ? त्याचं वजन तर बदलत रहातं ना !

😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇

यंत्र जेवढं मोठं तेवढी त्यातली गुंतागुंत जास्त.
बरं हे कोण सांगतंय तर, ज्या लॅबमधे आपण तपासणीसाठी जातो, त्या लॅबला असलेली कायदेशीर बंधने सांगत आहेत. जर चुकुन कोणी या दिलेल्या रिपोर्टविरोधात कोर्टात तक्रार वगैरे करायला जाणार असेल तर, त्याचाही काही उपयोग होणार नाही. कारण ‘कंडीशन ऑफ रिपोर्टींग’मध्ये आणखी एक वाक्य लिहिलेले असते.

“This medical dignostic report is not valid for medico legal purposes.”
आहे ना गंमत ?

😟😟😟😟😟😟😟😟😟😟😟
आश्चर्य वाटण्यासारखे आणखी एक विधान त्यावर लिहिलेले आढळते…
It is presumed that….

हे गृहीत धरले आहे, (काय? )

The test performed on the specimen belongs to the patients name or identified.

की, हा रिपोर्ट त्याचा आहे, ज्याचे नाव त्या सॅपलच्या बाटलीवर लिहिलेले आहे, ( म्हणजे त्याचेच असावे, असे वाटते. ) नक्की सांगता येणार नाही, की ते रिपोर्ट त्याचेच असतील.

😳😳😳😳😳😳😳😳😳😳😳
दिलेल्या रिपोर्टमधे एवढी संदिग्धता का ? एवढासुद्धा विश्वास ठेवायचा नाही का ?
मग विश्वास नेमका कोणत्या यंत्रावर ठेवावा ?

समर्थ म्हणतात,

”या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही”
हे यंत्र ज्याने निर्माण केले, तो परमात्मा

आणि ज्याच्याकडे शरीर, मन इंद्रियांसह, सांभाळायला दिले, तो अंतस्थ आत्मा, यांच्यावरच ना !

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts