arogydut/simple-living-principles-part-Thirteen | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग तेरा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग तेरा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही.

                  भाग चार

काही वेळा चिकित्सा पत्रके पाहून असे वाटते की, रोग परवडला पण औषधे आवर.

एका औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे, तिसरे… चौदा चौदा औषधे दिवसभरात. एखादा रूग्ण सकाळ दुपार रात्रीच्या फेऱ्यात कमीत कमी वीस वेळा तरी औषधं घेत असेल ! परत एवढ्या वेळा पाणी प्यायचे. बरं पाणी कमी प्यायले तर अंगाचा भडका होईल, एवढी उष्णता वाढते. करायचे तरी काय ? आणि जेवायचे तरी कधी ?
बरं औषध बंद करायची पण भीती वाटते, न जाणो चुकुन काही झाले तर ? कोणतातरी रिपोर्ट वाढला, कमी झाला तर ? रोगाविषयी एवढी भीती निर्माण करून ठेवली जाते की, औषधांचे दुष्परिणाम झाले तरी चालतील, किंबहुना ते गृहीतच धरले जातात.
भारत सरकारने जीवनावश्यक म्हणून अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांची जी यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्यात फक्त दीडशे ते दोनशे औषधे प्रकारची औषधे असतील. पण मार्केटमधे आज किमान पन्नास साठ हजार प्रकारची मिश्र औषधे विकली जात आहेत. ब्रुफेन सारखी काही औषधे तर प्रगत राष्ट्रामधे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच बॅन झालेली आहेत. पण भारतात मात्र ही औषधे आज भी धडल्ले से बेची जा रही है. डाॅक्टरांच्या चिठीशिवाय काऊंटरवर सुद्धा विकली जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. सावध आपणच रहायला हवे. सरकार तरी किती ठिकाणी लक्ष ठेवणार ना ?
औषधकंपन्याचा प्रचंड नफा हे या मागील खरे राजकारण आहे. जेनेरीक मेडीसीन आणि कंपन्यांनी बनवलेल्या औषधांच्या दरामधे असलेला फरक लक्षात घेतला, की समजेल किती नफा कंपन्या मिळवतात ते !
येनकेण प्रकारे औषधे विकायची त्यासाठी वाट्टेल ते प्रकार अवलंबायचे, हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षडयंत्र गेली कित्येक वर्षे सुरू आहे.
असो.
एक विनोद म्हणून सांगावासे वाटते. आजारी पडलो की, डाॅक्टरांकडे जायचे, त्यांची जी फी असेल ती फी कुरकुर न करता द्यायची, कारण डाॅक्टर जगला पाहिजे. सांगितलेल्या सर्व तपासण्या करायच्या, कारण पॅथाॅलाॅजिस्ट जगला पाहिजे. परत डाॅक्टरांकडे जाऊन जी औषधे लिहून दिली जातात, ती केमिस्ट कडून विकत आणायची, कारण केमिस्ट जगला पाहिजे.

आणि…

……. आणलेली सर्व औषधं तशीच ठेवून द्यायची कारण……..

…..

….

..

.

आपण जगलो पाहिजे.
विनोदाचा भाग सोडला तर परिस्थिती फार गंभीर आहे. नवीन औषधे शोधून शोधणार तरी किती ? मुळ द्रव्ये तर तेवढीच आहेत. त्यातील मुलद्रव्यांमधे, थोडाफार तर तम भावात फरक करून नवीन औषध करण्या पलीकडे गाडी पुढे जात नाहीये. मंदी येऊ नये, यासाठी सुद्धा काही वेळा विशिष्ट रोगाविषयी “हॅवाॅक” निर्माण केला जातो. याच्यामागे देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे भीती निर्माण करायची आणि आपला माल खपवायचा !
हे लिहिलेलं सुद्धा काहीजणांना “अति” कॅटेगरीमधील वाटेल. पण शेवटी सत्य कटू असते. कुठेतरी कोणाला तरी बोचणारच !

इलाज नाही.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts