arogydut/simple-living-principles-part-Nineteen | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग एकोणीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे भाग एकोणीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही.
भाग दहा
” जेनेरीक आणि ब्रॅण्डेड असं आयुर्वेदात नाही का हो भाऊ ?
सध्या जेनेरीक आणि ब्रॅण्डेडचे वारे वाहाताहेत वाॅटसप वर ! म्हटलं आपल्या आयुर्वेदात असं काही असतं का ? आयुर्वेदातील काही औषध महाग असतात, म्हणून विचारतोय राग मानू नका.”

एका रुग्णाचा फोनवरून भाबडेपणाने विचारलेला एक सहज प्रश्न.
खरंतर हाच विषय यापूर्वी गेल्या वर्षी वेगळ्या टायटलने येऊन गेला आहे. त्यावेळी टायटल होते, “स्वदेशी देशी आणि विदेशी !”
एकदा अकबराने प्रश्न विचारला,

सर्वात मोठे शस्त्र कोणते ? 🏹🔪🔫🗡

बिरबलाने नेहेमीप्रमाणे हजरजबाबी उत्तर दिलं, हाती असेल ते 💉💊✂🔨
आयुर्वेदाला काय जेनेरीक काय ब्रॅण्डेड ! रुग्णाला गुण येणं महत्वाचे !
न तु अहं कामये राज्यं

न स्वर्गं न अपुनर्भवम्।

कामये दु:खतप्तानां

प्राणिनाम् आर्तिनाशनम्।।
या श्लोकाचा अर्थ लक्षात घेतला कि औषधांच्या अर्थ व्यवस्थेत, काही अर्थ नाही हे लक्षात येईल.

श्लोककर्ते म्हणताहेत,

मला राज्य नको, मला स्वर्गातील इंद्रपदही नको, मला पुनः जन्म नको,

( मला कोणत्याही राजकीय पाठींब्याची गरज नाही, मला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मोह पण नाही, मला परत इलेक्शनलाही उभे राहायचे नाही, )

रोगाच्या दुःखाने तप्त झालेल्या माझ्या रुग्णांच्या वेदना तात्काळ कमी करण्यासाठी जे काही करता येईल, ते मी करेन.

( पण समाजसेवा करण्यासाठी मला स्वतंत्र पक्षही काढायचा नाही, जे काही करायचे ते तुमच्याबरोबर राहून करेन, पण मला अढळपद द्यावे. )
मी ज्या वैद्यकीय क्षेत्रात आहे, त्या आयुर्वेद शास्त्रामधील हे वचन विसरून कसे चालेल ? भले चार पैसे कमी मिळतील, कंठलंगोट बांधता येणार नाही, पायाला कापडी पिशवी गुंडाळायला जमणार नाही. (टाय आणि पायमोजे ) आणि भारतात गरज तरी काय ? तसं या ब्रॅण्डेड औषधांच झालंय.
ह. अगदी फरक दाखवायचाच झाला तर ग्रंथोक्त आणि पेटंटेड असा दाखवता येईल. ग्रंथोक्त म्हणजे ग्रंथात जशी वर्णन केली आहेत तशी, जसे च्यवनप्राश. आणि मूळ औषधी फाॅर्म्युल्यामधे बदल करून सरकार दप्तरी नोंद केली ते पेटंट प्राॅडक्ट बनते, जसे आंबा फ्लेवर च्यवनप्राश किंवा सोन्यामारूती च्यवनप्राश इ. कितीही उत्खनन करून बघितले तरी यात सोनं आणि चांदी काही सापडणार नाही, पण किंमत मात्र चौवीस कॅरेटहून भारी.
त्यामुळे ग्रंथोक्त औषधे खूप स्वस्त असतात, गुणवान असतात, आजच्या भाषेत ‘टाईम टेस्टेड’ आहेत, हजारो वर्षे झाली तरी त्रिभुवनकिर्तीचे नाव त्रिखंडात तसेच गाजतेय, किंवा ग्रंथोक्त सूतशेखरची घटकद्रव्ये तशीच आहेत, मग भारतातल्या कोणत्याही कंपनीने ही ग्रंथोक्त औषधे बनवली तरी फाॅर्म्युला तोच रहावा अशी सरकारची अपेक्षा असते. (आता आयुर्वेदीय औषधांचा क्वालिटी कंट्रोल हा संशोधनाचा भाग आहे, हे गृहीत धरले आहे. )
आयुर्वेद महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेल्या प्रत्येक वैद्याला दवाखान्यात आवश्यक असलेली औषधे, स्वतःची स्वतः तयार करता येतात, तेवढे प्रत्यक्ष ज्ञान त्याना महाविद्यालयाने दिलेले असते, (असे गृहीत धरलेले असते ) पण अन्य अभारतीय पॅथीमधली औषधे मात्र डाॅक्टर मंडळींना तयार करता येत नाहीत, त्यांच्या अभ्यासक्रमातील “औषध निर्माण” ही फार मोठी पोकळी आहे. त्यामुळे औषधांसाठी औषध कंपन्यावर अवलंबून रहाणे ही त्यांच्या व्यवसायाची गरज बनली आहे,
पण आयुर्वेदात मात्र अगदी कच्च्या मालापासून तयार औषध बनवेपर्यंतची सर्व औषध निर्माण कृती शिकवली गेल्याने, अगदी घरच्या घरी देखील स्वस्त आणि मस्त औषधे, कोणत्याही आयुर्वेद पदवीधारकांना बनवता येतात. त्यामुळे आयुर्वेदीय औषध कंपन्यांची बनवेगिरी कमी होते, साहाजिकच स्पर्धा कमी होते.
ब्रॅण्डेड वापरले नाही तर अवस्था जेनेरीकमधल्या त्या हिरो सारखी होते, असा एक फोटो व्हायरल होतोय. ब्रॅण्डेड म्हणजे खूप स्टॅण्डर्ड असा प्रचार मल्टीनॅशनल कंपन्याशिवाय आणखी कोण करणार ? यात नुकसान कंपन्यांचे होते आहे. डाॅक्टरांचे नाही. भारतातल्या डाॅक्टरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर नेम धरण्याचा कंपन्यांचा हा प्रकार आहे. इतकंच !
शेवटी औषध ते औषध. हाती असेल तर माती सुद्धा औषध ठरते, असं सांगणाऱ्या आयुर्वेदात ब्रॅण्डेड आणि जेनेरीक असा भेद कसा असू शकेल ?

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts