आमच्या विषयी | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News
आमच्या विषयी

नमस्कार

आज संगणकाच्या जगात विलक्षण क्रांती घडून आलेली आहे.लहान मुलापासून ते जेष्ठ नागरिकापर्यंत सर्वच जण संगणकाच्या संपर्कात येत असतात.कार्यालयात नाही तर घरी कुठे तरी संगणकाचा, इंटरनेटचा उपयोग करीत असतात.असा माणूस मिळणे कठिण जो संगणकापासून दूर आहे आणि मिळाला तर तो देखील आजच्या युगात स्मार्ट फोनच्या रुपात छोटा संगणक खिशात फोन घेऊन फिरताना दिसतो . आता बोला …आणि म्हणूनच पत्रकारितेचे प्रशिक्षण घेत असताना पत्रकारितेचा तिसरा प्रकार म्हणजे वेब मिडिया खूप आवडला .कारण यामध्ये प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण आहे असे जाणवले .आज जगात कोणतीही माहिती सेकंदात उपलब्ध होताना दिसते .म्हणूनच “व्यासपीठ डॉट कॉम”(www.vyaaspith.com) हे संकेतस्थळ आपल्या समोर घेऊन येत आहे. “व्यासपीठ” आपल्या सर्वांचे हक्काचे व्यासपीठ.

“व्यासपीठ” मध्ये “महाराष्ट्र” या सदरात महाराष्ट्रातील घडणार्‍यां घडामोडी बातम्या आपल्यासाठी उपलब्ध असतील.संपादक मध्ये मी स्वतः संपादकीय किंवा पाहुणे संपादक आपली बाजू मांडतील .देश विदेशातील खेळाच्या बातम्या “क्रीडा” मध्ये कु. भास्कर गाणेकर पाहणार आहेत. “लेख” या सदरासाठी मा.श्री.अरुण देशपांडे, मा.श्री.मिलिंद कल्याणकर तसेच ज्योती जाधव या लेखन करत आहेत .”चारोळ्या” या सदरात “मिलिंदाच्या चारोळ्या” किवा “बाबाजीची काव्याफुले” आपणास वाचण्यास मिळतील. भविष्यात अनुभवी कवी बरोबरच आपणास नवकवीच्या चारोळ्या आपणास वाचण्यास मिळतील यात शंका नाही.

“साहित्य” हे सदर या नावाला शोभावे असे असेल यात कविता ,शरदची गुगली,गजप्रहार वात्रटिका ,हास्यविनोद सारख्या विवध छटानी नटलेले असेल.”शरदची गुगली” ही शरद ठाकर हे दैनदिन जीवनात घडणार्‍या घटनावर आधारित असते. प्राथमिक पदवीधर शिक्षक असणारे शरद यांचे लिखाण वाखोण्या जोगे आहे.तर “वात्रटिका” मध्ये गजाभाऊ लोखंडे आपली वात्रटिका उत्तम प्रकारे सदर करताना आपणास दिसतील. महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून “रोजगार” हे सदर सुरु करण्यात आले आहे. ज्यामध्ये सरकारी व निमसरकारी नोकर्‍यांची माहिती उपलब्ध होईल .”वाचकांची पत्रे” हे सदर वाचकांना असलेल्या समस्या वाचक आम्हाला पाठवू शकतात .आपण समस्या व फोटो आमच्याकडे पाठवावा. आम्ही तो प्रसिद्ध करू व आपली समस्या मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करू .”फोटो गॅलरी ” मध्ये मा.श्री घनश्याम देशमुख आपल्या “बोलक्या रेषा” मार्फत विविध विषय घेऊन आपल्याशी बोलतील.”फोटो गॅलरी” मध्ये रोजच्या दैनदिन घडामोडीचे फोटो देखील प्रकाशित होत राहतील. .”व्हिडीओ गॅलरी ” मध्ये निवडक व्हिडीओ प्रकाशित होतील.

“मुलाखती” मध्ये पहिला आठवडा “खेळ”, दुसरा आठवडा “राजकारण”, तिसरा आठवडा “साहित्य”, तसेच चौथा आठवडा “उद्योग” अशा प्रकारे प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी ह्या मुलाखती प्रसारित होतील.आपण आम्हाला मेल किवा whatsup वर अभिप्राय देऊ शकता “संपर्क” मध्ये इमेल व whatsup क्रमांक दिलेला आहे. आपल्या सूचना आपण पाठवू शकता. थोड्याच दिवसात “व्यासपीठ” आपल्या सर्वांच्या जवळचे,लाडके, विश्वासचे माध्यम असेल यात शंका नाही आपण आपल्या सर्व मित्रपरिवाराला,नातेवाईकाना याबद्दल अवश्य कळवा व ” व्यासपीठ” ला भेट द्यायला नक्की सांगाल अशी आशा करतो. आपण नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत पोहचू हे निश्चित. ही विनंती.

“व्यासपीठ” चा आपला संपादक
सुर्यकांत भागाजी गोडसे

                                                                                                                                                                                   संपर्क : ८४२५८२२०९९