तू बा गुरुपुजा

तू बा गुरुपुजा

असे ठाई ठाई
तुझा सहवास |
तूचि रे प्रकाश
अंधाराचा ||

तू बा गुरुपुजा
क्रिष्णाई सावळी |
पहाट भूपाळी
वैकुंठाची ||

पाद्यपुजा तुझी
देवही भुलले |
पंढरी वसले
युगे युगे ||

तापल्या जीवाला
तूचि बा गारवा |
मोहक माधवा
मजसाठी ||

@ जिजाबराव वाघ

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!