abhang 296 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २९६

अभंग २९६

विनवितो नाथा

धाव पाव देवा
लागलीसे आस |
सोडविरे फास
कृपा व्हावी ||

तूचि कृपावंत
तूचि दयाघना |
ध्यास तुझा मना
नित्य आहे ||

पायी तुझ्या भाव
तूचि जपमाळ |
तुझे नाम टाळ
आहे ओठी ||

शिणलो थकलो
संसार ओढूनी |
ऐसी गा कहानी
लिहू किती ||

तेजाची सावली
मिळावी देहाला |
फुंकर जीवाला
घाल आता ||

विनवितो नाथा
तू पोटी धरावे |
हेचि दान द्यावे
भगवंता ||

@ जिजाबराव वाघ

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts