abhang 260 | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २६०

अभंग २६०

भूवैकुंठ नगरी झाली पंढरी
नांदतसे तेथे स्वयं श्रीहरी
शंख चक्र गदा पद्म शोभते करी
चतुर्भुज मूर्ती पितांबरधारी
किरिट कुंडले श्रीमुखावर शोभले
चंद्रसूर्य तेचि मिरविले
कासे पितांबर सोनसळा
विटेवर उभा हरि सावळा
दोन्ही कर कटीवरी
ध्यान करी त्रिपुरारी
सनकादिक भक्त पुंडलिक
मुनी वर भक्तांसाठी
आनंदाचा कद उभा ठाके भीमेकाठी
संत चोखामेळा सांगती अभंगातून
ऐका श्रोतेहो ध्यान देऊन

@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!