abhang 259 | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २५९

अभंग २५९

पंचपंच उषःकाली केले स्नान
संत सावता माळींनी घातले आसन
नवज्वरे देह झाला जरि संतप्त
विठ्ठल नाम मनी आर्त घेत
प्राणायाम करुन कुंभक साधिला
मूळतत्वी वायू रोखूनी धरीला
शालीवाहन शक ,संवत्सर मन्मथ
बाराशे सतरा शके ग्रीष्म ऋतुत
आषाढ कृष्ण चतुर्दशी असे ती तिथी
सहस्त्ररश्मी दिनकर येता उदयासी
पांडुरंग स्वरूपी एकरुप जाहले
संत सावता माळी पांडुरंग चरणी लीन झाले
कर्म भक्तीचा साधला संगम
संत सावता माळी यांसी प्राचीचे वंदन

@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts