abhang 252 | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

अभंग २५२

अभंग २५२

कुलस्वामिनी वंदन तुला
मिळो तुझ्या मायेचा जोगवा
आले शरण तुझ्या चरणी
कृपा राहो भक्तांवर नित्य
अपर्णा तूच मनरमणी

अंबाबाई करवीरची तू
तूच भवानी तुळजापूरी
रेणुका तू माहुरगडची
सप्तशृंगी माता तू असशी
तू सप्तशृंग गडावरची

अविरत राहो तुझी कृपा
छत्रछाया आम्हा भक्तांवर
दर्शनाची आस मम मनी
सुखी राहोत माझी लेकरे
एवढीच करिते विनवणी

प्राची देशपांडे
कँलिफोर्निया

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts