अभंग २४१

अभंग २४१

अज्ञान मी बालक
न कळे ज्ञान आम्हा
न कळे पुराण
न कळे वेदांचे वचन आम्हा
आगमनिगम न कळे भेद
वेदशास्त्र आम्हा
न कळे संवाद
योग याग तप अष्टांग साधन
न कळे आम्हा तप व्रत दान
पामर मी तुमच्या चरणीचा
दास मी शरण तव पायीचा
माझा भोळा भाव
हेची रे साधन
नित्य मुखी गाईन
केशवाचे नामस्मरण
संत चोखामेळा सांगती अभंगातून
ऐका श्रोतेहो ध्यान देऊन

@ प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!