अभंग २३८

अभंग २३८

तुच माझी माऊली
तुच माझी सावली
भक्तीभावे आळविते
सावळ्या विठ्ठलाते
पंढरीत राहिलास
युगे झाली अठ्ठावीस
भक्त पुंडलीकासाठी
आले भूवर जगजेठी
भक्तांची आस पुरवीसी
भक्तांसाठी नित्य तूची
सावली मायेची धरीसी
अवघा संतमेळा नित्य
भरतो एकादशीला पंढरीत
तुझ्या दर्शनाने भक्त
मनी शांत होत
ठेव कृपेचा वरदहस्त
हीच मनिषा बाळगते
प्राचीची पुरवी आस
तवचरणी माथा टेकविते

प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!