अभंग २३१

अभंग २३१

दुर्लभ ते रुप सुलभची झाले
सगुणरुपे साकारची झाले
आवडीने विठूराय पंढरीत आले
युगे अठ्ठाविस उभेची राहिले
महिमा तयाचा अपरंपार
दुमदुमला चंद्रभागातीर
वैष्णवांचा भार सहजी पेलतो
भक्तांसाठी विठू कीर्तनात नाचतो
स्वभक्तांचे कोड पुरवितो
भजनात हरि रंगूनिया जातो
संत चोखामेळा सांगती अभंगातून
ऐका श्रोतेहो ध्यान देऊन
प्राची देशपांडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!